भोकर:(दि.8 नोव्हेंबर)
रमेश जी.गंगासागरे
मागील अनेक वर्षपासून प्रलंबित असलेल्या भोकर शहरातील एमआयडीसीच्या १९ एक्कर जागेत व्यापारी संकुलासाठी मंजुरी मिळाली असून व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोणातून लवकरच व्यापारी संकुल होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी दिली.
रविवार दि.7 नोव्हेंबर रोजी भोकर येथील डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव शेडच्या भूमिपूजन व दिपावली निमित्त पान सुपारी कार्यक्रमात ना.चव्हाण बोलत होते. यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर जि.प.सदस्य प्रकश देशमुख, मारोतराव कवळे पाटील, आनंदराव पाटील मांजरीकर, विनोद पा. चिंचाळकर, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, गोविंद पाटील गौड, जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, सुभाष पाटील किन्हाळकर, उपसभापती गणेश राठोड, सतीश देशमुख, बाबुराव आंदबोरीकर, बाबुराव सायाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ना.चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेत मालाची पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेऊन लिलावशेड करणार असल्याचे या पूर्वी अभिवचन दिले होते, ते आज आपण पूर्ण केले आहे. बाजार समितीच्या यार्डात लवकरच १ कोटी ६४ लाखाचे लिलाव शेड होणार आहे. तसेच येथील एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्नही सोडविला आहे. एमआयडीसीच्या जागेत व्यापारी संकुलासाठी मंजुरी मिळाल्याने व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी जागा मिळणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण कमी होईल, व्यापारी संकुलात ४० ते ५० दुकाने राहतील. पंधरा दिवसात शहरातील उडानपूल सुरु होईल. पिक विमा व अतिवृष्टीचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११०० कोटी लवकरच बँकेत जमा होणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना बँकेत व्यवस्थित वागणूक न देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची गय करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या एकजुटीने व सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जितेश अंतापुरकर हे विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात सभापती जगदीश पाटील यांनी ना. अशोकराव चव्हाण यांच्यामुळे झालेल्या विकास कामाची माहिती दिली.सूत्रसंचालन माजी नगरसेवक मनोज गिमेकर यांनी तर आभार रामचंद्र मुसळे यांनी मानले. यावेळी देवानंद धूत, सुरेश चिंतावार, श्याम आसावा, सुभाष नाईक, शिवाजी देवतुळे, अप्पाराव राठोड, धोंडीराम भिसे, सचिव पि.जी.पूजेकर, आत्रिक पाटील मुंगल, रमेश महागावकर, मिर्झा ताहेर बेग, विनोद चव्हाण, सना इनामदार, गंपू पाटील, केशव पाटील पोमनाळकर, उत्तम राठोड, संतोष चव्हाण, गोविंद देशमुख, आदिसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments