रमेश गंगासागरे
छावा संघटनेचे शंकर पाटील बोरगावकर म्हणजे अंगी प्रचंड संघटन कौशल्य ठेवून छावाचे अनेक मावळे जमुन गावागावात शाखा उघडण्याची कला फक्त शंकर पाटील यांनाच जमात असल्याने त्यांच्या अंगी प्रचंड संघटनकौशल्य असल्याचे मत छावाचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यक्त केले ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.
छावा संघटनेचे जिल्हा संघटक प्रमुख श्री शंकर पाटील बोरगावकर यांचा आज 3 नोव्हेंबर रोजी वाढदिवस असल्याकारणाने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी छत्रपती शिवाजी चौक भोकर येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली त्यानंतर भोकर तालुक्यातील 11 खेडेगावांमध्ये जाऊन छावा संघटनेच्या शाखा उघडण्यात आल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, दशरथ पाटील कपाटे नांदेड जिल्हा, अध्यक्ष सत्तार भाई पठाण मुस्लिम आघाडी, तानाजी पाटील नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष, शरद पाटील बटाळकर, स्वप्नील पाटील रातोळीकर कंकाळ महेश पाटील संघटक, तसेच कुंभकर्ण पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दुपारी भोकर येथील नवा मोंढा भागातील त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भोकर शहरातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा "समई" देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील म्हणाले की, आजपर्यंत छावा संघटनेमध्ये कित्येक आले आणि राजकीय पक्षांमध्ये गेले पण छावा संघटनेमध्ये टिकून असलेला एकमेव सच्चा कार्यकर्ता म्हणून शंकर पाटील बोरगावकर, टिकून आहेत. तसेच भोकर तालुकाध्यक्ष ते जिल्हा संपर्क प्रमुख या पदावरचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. अत्यंत कार्यकुशलतेपणे त्यांनी मावळे जमवले असल्याने जिल्हामध्ये त्यांचे नाव झाले आहे. आपण वाचत आहात भोकर न्यूज लाईव्ह मागील बारा वर्षापासून ते संघटनेचे कार्य जोमाने करत आहेत असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनियर विश्वंभर पवार यांनी केले, कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधव पाटील बोरगावकर यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष परमेश्वर सावळे पा.यांनी मानले. कार्यक्रमास असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.
0 Comments