औरंगाबाद:(दि.5नोव्हेंबर,वृत्त संस्था)
रमेश गंगासागरे
सोशल मीडियावरून ओळख झालेल्या विजातीय जोडप्या विषयी थोडक्यात माहिती अशी की, मुलगा 24 वर्षीय औरंगाबाद येथे रहाणारा तर मुलगी 21 वर्षीय नागपूरची रहाणारी दोघांची प्रथम 6 महिन्यापूर्वी भेट झाली ती शोषल मिडियावरच मग दररोज बोलणे चालू झाले. कालांतराने ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले मुलाने तिला लग्नाची मागणी घातली. मुलीने त्यास होकार दिला. त्यानंतर पळून जाऊन लग्न करायचे ठरले होते. म्हणून मुलगी थेट नागपूरहून औरंगाबाद येथे आली. मुलाने तिला घरी न नेता एका हॉटेलात नेले. जेवनानंतर दोघे चहा घेऊन गप्पा मारत असतांना तिथे दत्त म्हणून त्याचा मेव्हणा आला. त्याने त्या तरुणाला नागपूरच्या मुलीसोबत बघितले,अन त्याचे पित्त खवळले त्याने त्याच्या भावजीला मुली विषयी विचारले तर तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. म्हणून त्या ठिकाणी दाजी भावजीचे कडाक्याचे भांडण चालू झाले, प्रकरण हातापाईवर आले,अन हे भांडण थेट क्रांती चौक पोलीस ठान्यात गेले. तिथे गेल्यावर मात्र नागपुरच्या त्या मुलीचे डोळेच उघडले, कारण तो तरुण एक ट्रक चालक असून फक्त पाचवी पास असून यापूर्वी त्याचे दोन लग्न झालेले आहेत. नागपूरची मुलगी तरुणाच्या मनाने उच्च शिक्षित. अन श्रीमंत घराण्यातील होती. त्या मुलीपासून त्याने सर्व लपवून ठेवले होते. सत्य परिस्थिती लक्षात आल्या नंतर तिने सुधा त्या तरुणाला 4 शिव्या हासाडल्या. क्रांतिचौक पोलिसांनी पण कान उघडले. ठाण्याचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे, डीओ पोलिस अधिकारी डॉ. विशाल इंगळे यांनी दोघांची बाजू समजून घेतली. पोलिसांसमोर खरा प्रकार समोर आल्यानंतर सहा महिन्यांच्या मैत्रीवर विश्वास ठेवणे चुकल्याची स्वाती ला (नाव बदललेले) जाणीव झाली. पोलिसांनी तत्काळ तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यानंतर वडिलांशी बोलणे झाल्यावर मुलीने आपली चूक कबूल केली. आणि नागपूरला जाण्याची तयारी दर्शवली. यावेळी तरुणाचे कुटुंब देखील मुलाबाळांना घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनाही खरा प्रकार समजला. अन नागपूरच्या मुलीचे थोडक्यात जीवन उध्वस्त होता होता राहिले.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.
0 Comments