भोकर :(14 नोव्हेंबर)
   रमेश गंगासागरे 
       एसटी चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासंदर्भात मागील 18 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी सामूहिक आंदोलनाचे हत्यार उपसले असून राज्य शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय माघार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मागील 18 दिवसांपासून महामंडळा मधून एकही बस बाहेर निघाली नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली असून निलंबन मंजूर आहे, पण माघार नाही. असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी भोकर आगारातील जवळपास शंभर कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध म्हणून सामूहिक मुंडणाचा कार्यक्रम केला, तर उद्या दिनांक 15 नोव्हेंबर रोजी विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी भोकर तहसीलवर कर्मचाऱ्यांनी मुलाबाळांसह मोर्चा आयोजित केल्यामुळे ह्या मोर्चाकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे. आपण वाचत आहात भोकर न्यूज लाईव्ह दरम्यान एसटी बंद असल्यामुळे भोकर शहरामध्ये अवैध वाहतुकीने कळस गाठला असून त्यांनी संधीचे सोने केले आहे. नागरिकाकडून व प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून गाडीत प्रवेश दिल्य जात असल्याचे अनेक प्रवासी नागरिक बोलत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडून तसेच त्यांची मागणी पूर्ण करून एस. टी. महामंडळ पूर्ववत चालू करावे असे अनेक नागरिक बोलत आहेत.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा