भोकर:(दि.11 ऑक्टोबर)
    रमेश गंगासागरे 

    उत्तर प्रदेशातील लखमीपूर शेतकरी आंदोलनात भाजपच्या मंत्री पुत्राने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन 
घालून चिरडून ठार केले. या हत्याकांड  घटनेच्या निषेधार्थ राज्यात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला आज सोमवारी भोकरमध्ये उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
   न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्ररेशातील लखमीपूर येथे भाजप मंत्र्यांच्या पुत्राने चिरडून ठार केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या बंदच्या आव्हानाला भोकरमध्ये कडकडीत बंद ठेवून उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉगेस, शिवसेनेचे कार्यकर्ते सकाळपासूनचं रस्यावर उतरले होते. आंदोलनात  भाजपा, व मोदी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. शहरातील डॉ.आंबेडकर चौक, किनवट रोड, छत्रपती शिवाजी चौक, बसस्टॅड, नांदेड रोड, मोंढा परीसर कडकडीत बंद होता. या आंदोलनात  सभापती जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, शिवसेनेचे सतिष देशमुख , सुभाष नाईक, माजी नगराध्यक्ष विनोद पा. चिंचाळकर, कॉग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष भगवान दंडवे, माजी सभापती गोविंद पाटील गौड, गणेश बोलेवार, उपसभापती गणेश राठोड, रामचंद्र मुसळे, डॉ. फिरोज इनामदार, जवाजोदीन बरबडेकर, बाबुराव सायाळकर, सुर्यकांत बिल्लेवाड, बाबुराव आंदबोरीकर, माधव अमृतवाड, सुनिल चव्हाण, सुर्यकांत चिंचाळकर, मनोज गिमेकर, गोविंद देशमुख, मिर्झा ताहेरबेग, शिवाजी देवतळे, आप्पाराव राठोड, सुहास पवार, एम.ए. रजाक, सना इनामदार, गंपू पाटील, दिलीप तिवारी, आनंद चिठे, रमेश महागावकर, साहेबराव भोंबे, विठ्ठल धोंडगे, सिद्धेश्वर  पिटलेवाड, गौतम कसबे, गोविंद मेटकर, आरेफ इनामदार, आदीनाथ चिंताकुटे, सुलोचना ढोले, सुरेखा माळे, कमल गाजुलवार, आदीसह महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.