भोकर :(दि.2 ऑक्टोबर )
      रमेश गंगासागरे

स्वतःचे कार्य करत समाज सेवा करणे अनेकांना अशक्य असते पण स्वतःचे ड्युटी आणि कार्य करत नगरपरिषदेतील कर्मचारी दिलीप वाघमारे यांनी एका असहाय्य नागरिकास मानव सेवा समजून दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केल्याने त्या नागरिकाचे प्राण वाचले आहे.
       मानव सेवा हिच ईश्वर सेवा समजून आज पर्यंत अनेक बेवारस व्यक्तींना दवाखान्यांमध्ये पोहोचवले, मृत व्यक्तींचे अंत्यविधी केले, यासह वेळोवेळी नेमून दिलेले कार्य त्यांनी लीलया पार पाडले आहे. त्यामुळे भोकर नगर परिषदेमधील कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून दिलीप वाघमारे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी आपल्या काही निवडक कर्मचार्‍यांना सोबत घेऊन परवा पासून बस स्थानक परिसरामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका नागरिकास दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले तर मागील महिन्यात कृष्ण मंदिर मध्ये मृत्यू पावलेल्या एका बेवारस महिलेवर  त्यांनी अंत्यसंस्कार करून मानवतेचा संदेश दिला आहे.भोकर बसस्थानकाच्या परिसरामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीचे नाव त्याच्याजवळ मिळालेल्या आधार कार्ड वरून लालु लक्ष्मण असे असून तो धारजणी ता. भोकर येथील रहिवासी असल्याचे कळते.याबरोबरच त्यांनी शहरात जखमी झालेल्या असंख्य गाय, बैल, यांना भोकर येथिल पशू वैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या टीम वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.