भोकर :(दि.18 ऑक्टोबर)
     रमेश गंगासागरे

नांदेड येथील तंबाखू नियंत्रण कक्षाचे एक पथक  भोकर शहरात येऊन दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या अनेक किराणा दुकान तसेच असंख्य पानपट्टयावर टाकलेल्या धाडीमधून हजारो रुपयांचा दंड आकारून मोठी वसुली करण्यात आली असून याबाबतची अधिकृत माहिती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील पत्रकारांना देण्याचे टाळले.
       दि. 13 ऑक्टोबर रोजी शहरात अन्न भेसळ अधिकारी येऊन मोठ्या प्रमाणे दंड आकारत अल्याच्या धास्तीने शहरातील असंख्य पानपट्ट्या आणि किराणा दुकाने पटापट बंद झाले होते, ज्या काही पानपट्ट्या आणि किराणा चालू होते, ते आलेल्या अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडल्यामुळे त्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून  मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात आली. याबाबत आलेल्या अधिकाऱ्यांच्या शोधात आम्ही जाऊन सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आलेले अधिकारी हे अवघ्या तासभराच्या आतच वसुली करून निघून गेल्यामुळे नेमके कोणते अधिकारी भोकर शहरात आले होते याची इत्यंभूत माहिती मिळू शकली नाही. तसेच किती दुकानावर व पान पट्ट्यावर अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या व या धाडीच्या माध्यमातून किती रुपये दंड जमा झाला, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र आलेल्या अधिकाऱ्यांनी शहरात लाखो रुपयांची वसुली केल्याची चर्चा नागरिक करत आहेत काही नागरिकांनी आम्हाला दंडाच्या पाहता दाखवल्या त्या दंडाच्या पावत्या वर पन्नास रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत दंड आकारण्यात आला असल्याचे दिसून येते संबंधित अधिकारी हे दर महिन्यास भोकरला येणे अपेक्षित आहे पण तसे न करता हे अधिकारी दसऱ्याच्या व दीपावलीच्या मुहूर्तावर वर्षातून एकदा भोकरला येऊन मोठ्याप्रमाणात वसुली करून जाण्याचे प्रयोजन भोकर शहरातील नागरिकांना काही कळाले नाही. त्यामुळे आलेल्या अधिकाऱ्यावर भोकरचे नागरिक शंका घेताना दिसून येत आहेत.

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा