भोकर:(10 ऑक्टोबर)
    रमेश गंगासागरे

7ऑगस्ट रोजी भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोकर ते हिमायतनगर जाणाऱ्या रस्त्यावर एका माणसाला मारहाण करून त्याचा मोबाईल लुटून नेणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीसांनी जेरबंद केले आहे.
     घटनेबाबद थोडक्यात माहिती अशी की, भोकर तालुक्यात मोबाईल चोरीचे व मोटारसायकल चोरीचे सत्र वाढले होते. त्यातच दि.7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी भोकर-हिमायतनगर रस्त्यावरील थेरबन जवळ चढाच्या रस्त्यावर जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला रस्त्यात थांबवून त्याला मारहाण करून त्याचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून पोबारा केला होता. याबाबत तांत्रिक पध्दतीने या गुन्ह्यावर लक्ष ठेवण्यात आले. त्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले सहकारी पोलीस अंमलदार गोविंदराव मुंढे, शंकर म्हैसनवाड, संजीव जिंकलवाड, सखाराम नवघरे, केंद्रे, हणमंत पोतदार आदींना भोकर विभागात पाठविले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने भोकर तालुक्यातील थेरबन येथे टाकलेल्या धाडीत 2 मोबाईल चोर पकडले त्यांना  ताब्यात घेवुन, त्यांच्याकडे विचारपुस केली असता हा मोबाईल वाटमारी करून लुटलेला असल्याची  कबुली त्यांनी दिली. या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कायदेशीर कार्यवाही पुर्ण करून पोलीस ठाणे भोकरच्या स्वाधिन केले आहे. आता भोकर पोलीस ह्या चोरट्याकडून मोबाईल चोरीचे व मोटारसायकल चोरीचे किती प्रकरण उघडे करते हे पाहणेच योग्य ठरेल.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.