भोकर :(दि.1 ऑक्टोबर )
    रमेश गंगासागरे
भोकर येथील जुने तहसीलदार श्री,भरत सूर्यवंशी यांची बदली झाल्याने त्यांच्या ठिकाणी तहसीलदार श्री राजेश लांडगे यांनी भोकरचे नवीन तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे.
       भोकर तालुक्याला सर्वपरिचित असलेले व भोकर तालुक्याशी नाळ जोडलेले तहसीलदार म्हणून राजेश लांडगे यांच्याकडे पाहिले जाते. तहसीलदार होण्याच्या पूर्वी श्री लांडगे हे पाच वर्ष भोकर तालुक्यातील वाकद या गावी शिक्षक म्हणून काम केले आहे. अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे श्री राजेश लांडगे यांनी शिक्षकी पेशा वर समाधान न मानता त्यांनी एमपीएससीमार्फत परीक्षा देऊन ते पहिल्याच प्रयत्नात थेट तहसिलदार या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांनी उमरी, नांदेड आदी भागांमध्ये यशस्वीरीत्या काम केले आहे. ते भोकर येथे पदभार स्वीकारल्याचे कळताच भोकर तालुक्यातील त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे भोकर शहरात स्वागत करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये पत्रकार रमेश जी.गंगासागरे, संभाजी चेरकेवाड सिद्धेश्वर पिटलेवाड, सरपंच माधव बोईनवाड, वैभव पाटील साईनाथ याटेवाढ, सरपंच उतम राठोड, दत्तात्रय घोडेकर, मंसूर खान पठाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व चाहत्यांनी तहसीलदार श्री राजेश लांडगे यांना शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या Home वर क्लिक करा.