भोकर :(दि.6 सप्टेंबर )
रमेश गंगासागरे
भोकर ते निर्मल जाणाऱ्या रोडवरील रहाटी या गावाजवळचा पूर्वी कार्यरत असलेला RTO चेक पोस्टचा नाका रोड रुंदी करणा दर्म्यान हटविण्यात आला होता, हा नाका पूर्ववत चालू करून वाहन धारकांना दिलासा द्यावा,म्हणून भोकर शहरातील विविध पक्ष व संघटनांनी वरिष्ठांना निवेदन दिले आहे.
काँग्रेस प्रणित वाहन चालक संघटनेचे मन्सूरखान पठाण, ऑल इंडिया पँथर संघटनेचे भोकर तालुका अध्यक्ष निखिल हंकारे, MIM चे माजी तालुका अध्यक्ष करीम करखेलीकर, मातुळचे उपसरपंच बोईनवाड, शेख खदिर मामा, शेख सदाम शेख समुन यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी भोकर व वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातून तेलंगाणात जाणाऱ्या व तेलंगाणातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या
वाहनांना नांदेड येथे दूरवर जाऊन परवाना काढावा लागत आहे, त्यामुळे त्यांना कोणी पकडल्यास मोठा दंड लावल्या जाण्याची शक्यता आहे, तसेच या रोडवरून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी व वाहतूक होत आहे, अवैद्य प्रवासी वाहतूक सुद्धा वाढली आहे, या ठिकाणी नाक किंवा चेक पोष्ट नसल्यामुळे शाषणाचा महसूल बुडत आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ RTO कार्यालयाचा चेक पोष्ठ नाक उभारावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री, अशोक चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आल्या आहेत.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या Home वर click करा.
0 Comments