भोकर:(दि.30 सप्टेंबर )
रमेश गंगासागरे
तालुक्यात सप्टेंबर महीन्यात दोन वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पिंकाचे शंभर टक्के नुकसान झाल्याने भोकर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपये हेक्टरी तात्काळ मदत करण्याची मागणी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात कॉग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यात सप्टेंबर महीन्यात दोन वेळा संततधार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे शेतातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. हाती आलेली सर्वचं पिके पावसामुळे गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेवून भोकर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, व पंतप्रधान पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजूर करण्यासाठी राज्यशासन व केंद्र शासनाने पिक विमा कंपनीला आदेशीत करुण नुकसान भरपाई देण्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तहसिलदार राजेश लांडगे यांनी निवेदन स्विकारले. निवेदनावर जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, जि.प. सदस्य प्रकाश देशमुख, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, उपसभापती गणेश राठोड, संचालक रामचंद्र मुसळे, माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, प. स. सदस्य सुर्यकांत बिल्लेवाड, आप्पाराव राठोड, मानव कल्याणचे एम.ए. रजाक, बी.आर. पांचाळ, डॉ. अशोक माझळकर, माजी नगरसेवक मनोज गिमेकर, केशव पाटील पोममाळकर, धनराज जाधव, गोविंद मेटकर,आनंद चिंचाळकर, निळकंठ वर्षेवार, माधव बोईनवाड, गणपत राठोड, अमोल खांडेकर, रमन पाटील शिंदे, रामदास कोरंटलू, शेषराव हुरदुके, बापूराव वाघमारे, आदीसह असंख्य कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.
0 Comments