भोकर :(दि.16 सप्टेंबर )
        प्रतिनिधी

सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून महाराष्ट्रात सगळीकडे साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने भोकर मधील विविध अंगणवाड्यांमध्ये मागील पंधरा दिवसापासून कुपोषण मुक्ती बाबत अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जात असून या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असल्याचे चित्र शहरात सगळीकडे दिसत आहे.
     
 मागील पंधरा दिवसापासून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची सुरुवात वार्डा- वार्डात रॅली काढून करण्यात आली 15 दिवसांमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात वृक्षारोपण, गर्भवती महिलांना आहाराचे महत्त्व पटवून सांगणे, कोविड लसीकरण बाबत जनजागृती करणे, सार्वजनिक गणेश मंडळात जाऊन पोषण महिन्याचा प्रचार करणे, सीबीई कार्यक्रम राबविणे, लहान मुलांना योगा शिकविणे, पाककृती कार्यक्रम अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम शहरातील विविध अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अनेक कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दिनांक 14 सप्टेंबर रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी युनिट-3 चे श्री वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ए.डी.शेटे यांनी भोकर येथे चालू असलेल्या पोषण माह कार्यक्रमास समता नगर येथील अंगणवाडीस भेट देऊन उपस्थित गर्भवती मातांना आहाराबाबतची इत्यंभूत माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी वार्डातील असंख्य महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर पर्यवेक्षिका शेटे यांनी शहरातील विविध अंगणवाड्यांना भेटी दिल्या असून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या Home वर क्लिक करा.