भोकर :(दि.10 सप्टेंबर )
     रमेश गंगासागरे
विज्ञान युगात हस्तकला लोप पावत आहे. पण हस्तकलेला जोड नाही असे म्हटले जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भोकर तालुक्यातील रिठा येथील एका तरुणाने पर्यावरणाला पोषक तांबड्या माती पासून श्रीगणेशाची तीन फुटाची आकर्षक व भव्य मूर्ती बनवून आदर्श निर्माण केला आहे.
       

आज 10 सप्टेंबर रोजी सकाळी श्री गणेशाचे वाजत गाजत सगळीकडे आगमन झाले आहे. अनेक नागरिक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या श्रीगणेशाच्या मुर्त्या खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. पण प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मुर्त्या पाण्यामध्ये विरघळण्यासाठी खूप मोठा कालावधी जात असतो. अनेक वेळा तर त्या मुर्त्या वर्षभर विरघळत नाहीत. म्हणून नागरिकांनी मातीच्या मुर्त्या खरेदी करून त्याचे पूजन करून विसर्जन करावे या आशयाचा संदेश रीठा येथील तरुणाने दिला आहे. त्या तरुणाचे नाव आहे ज्ञानेश्वर पोत्तना राजरवाड, ज्ञानेश्वर यांनी
 बनवलेल्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे लाल मातीमध्ये बनविण्यात आली असून त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. गणेशाचे मुकुट हिरेजडित असल्याचा भास होतो आहे. चार भुजाधारी मूर्तीमध्ये एका हातात गधा तर दुसऱ्या हातात असुरांचा वध करणारी कट्यार आहे. ही सुंदर मूर्ती पाहण्यासाठी गावातील असंख्य नागरिक गर्दी करत आहेत. ज्ञानेश्वर राजवाडे यांना लालमात दूरवरून आणण्यासाठी गावातील लक्ष्मण गोविंदराव कोरंटलूबालाजी बाबुराव कोरंटलू, आवदुत माधव कोरंटलू, माधव राजरवाड, व मारोती बांबलवाड यांनी मदत केली आहे.