भोकर :(दि.7 सप्टेंबर )
     रमेश गंगासागरे

   शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या बैल पशुधनाना काल दिनांक 6 सप्टेंबर रोजी कामावरून सुट्टी देत त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी बैलपोळा सण सर्वत्र साजरा करण्यात आला.
        राज्यात सर्वत्र कोरोना संकटकाळ चालू असल्यामुळे काहीसा गाजावाजा न करता अनेक ठिकाणी छोटेखानी का होईना पोळा सण साजरा करण्यात आला. सकाळी बैलांना अंघोळ घालण्यात आली होती. त्यांना चांगल्या प्रतीचे वैरण देण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या ऐपतीनुसार बैलांवर साजही करण्यात आला होता. तसेच तसेच सुंदर सजवलेल्या बैलांची मिरवणूक भोकर तालुक्यात अनेक ठिकाणी काढण्यात येऊन त्यांची आरती करण्यात आली होती. आपण वाचत आहात भोकर न्यूज लाईव्ह . दरवर्षी पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो पण मागील दोन वर्षापासून हा सण अल्प प्रमाणामध्ये साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी दिसून आले. दर वर्षी अनेक जण मानासाठी अडून बसलेले असतात काही ठिकाणी तर मानासाठी भांडणे आणि मारामाऱ्या झालेल्या आपण ऐकत असतो पण अनेक खेडेगावांमध्ये या वर्षी ही मानाची प्रथा बंद होत असल्याचे चित्रही पहावयास मिळाले.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या Home वर click करा.