रमेश गंगासागरे
भोकर शहरात मटका घेणाऱ्याची संख्या दिवसागणिक वाढत असून अनेकांचे संसार मटक्यामुळे वर येत आहेत तर अनेकांचे संसार मटक्यामुळे रसातळाला जात असल्याचे चित्र शहरात सगळीकडे दिसत आहे.
वाढत्या बेरोजगारीमुळे हाताला काम नाही, घर चालवायला पैसे लागतात, यासाठी शहरातील काही बेरोजगार तरुण व नागरिक मटका या अवैद्य व्यावसायाकडे वळुन मटका घेण्यासाठी एजंटची भूमिका बजावत आहेत. मागील अनेक महिन्यापासून भोकर शहरात बसस्थानक परिसर, शिवाजी चौक, तहसीलच्या परिसरात, पांनठेल्यावर, पंचायत समिती जवळ, रेल्वे स्टेशन परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नूतन शाळेच्या परिसरात, मुदखेड रोडवर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, विश्रामगृहा जवळ, व रेल्वे गेटच्या आसपासच्या परिसरात असंख्य मटका घेणारे एजंट कार्यरत झाले आहेत. काही जण मोबाईल वरून ठराविक वेळेत मटका घेत आहेत. यामुळे भोकर शहर हे मटक्याचे माहेर घर बनल्याचे बोलल्या जात आहे. मटका खेळणाऱ्या मध्ये अनेकजण बाहेरच्या तालुक्यातुन येत आहेत. रिक्षाचालक, फेरीवाले, मजूर, चालक, हॉटेलातील नोकर, या सारखे सामान्य नागरिक मटका खेळता खेळता बरबाद होत आहेत. भोकर शहरात मटक्याचा वाढता प्रार्दुभाव लक्षात येताच काही दिवसापूर्वी भोकर पोलिसांनी बोरगाव रोडवरील शाहू शाळेच्या समोर एका घरातील मटका बुक्कीवर धाड टाकली तेंव्हा तिथून मोठ्याप्रमाणावर मटका जुगाराचे साहित्य, रोकड व मटका घेणारे भोकर येथिल नागरिक सापडले होते. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती, या कारवाईने 2 दिवस खेळ बंद होता, त्यानंतर मात्र शहरातील वरील भागात पोलिसांना न जुमानता नव्या जोमाने मटका एजंट मोबाईल वरून मटका घेण्यास कार्यरत झाले असून ते आपले काम दररोज करत आहेत.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.
0 Comments