रमेश गंगासागरे
भोकर तालुका मूळचा आमचा असून भोकर तालुक्यावर कोणाचीही मक्तेदारी नाही, भोकर तालुक्याचा आम्ही विकास केला पण मध्यंतरीच्या काळामध्ये भोकरचा म्हणावा तेवढा विकास झाला नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली, ते भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये घरवापसी केल्यानंतर प्रथमच भोकर शहरात आले असता श्री शाहू महाराज विद्यालय यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुन्हा राष्ट्रवादी पक्षांमध्ये घरवापसी केल्यानंतर बापूसाहेब गोरठेकर हे प्रथमच आज दि. 31 जुलै रोजी दुपारी 3 वाजता भोकर शहरात आले होते, यावेळी उमरी रोड लहुजी चौक येथून ते शाहू विद्यालया पर्यंत त्यांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती, मोटर सायकल रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये येताच ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री शाहू महाराज विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते, ते पुढे म्हणाले की नांदेड येथे आसना नदीवर 2 उड्डाणपूल बांधले, पण भोकर शहरातील एकच उड्डाणपुल आजपर्यंत तयार झाला नाही, भोकर शहरात काहीजनांनी प्लॉटिंगचा धंदा सुरू केला आहे, जिकडे प्लॉटिंग तिकडे विकास होत आहे, भोकर शहराच्या विकासासाठी दोनशे कोटी रुपये आले होते, ते कुठे गेले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला, भोकरच्या नागरिकांना सध्या वाऱ्यावर सोडलेले दिसून येत आहे, पण माझी भोकरची नगरपरिषद येताच मी भोकरच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे, माझे जीवनच संघर्षाचे राहीले असून मी मरेपर्यंत विरोधकाशी संघर्ष करत राहणार, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी मंचावर आनंदरावजी येलमगुंडे, एडवोकेट लामकानीकर, बालाजीराव जाधव, श्रीनिवास भाऊ गोरठेकर, कैलास भाऊ गोरठेकर, सदाशिवराव पोपलवाड, आनंदराव पाटील बोरगावकर, पांडुरंग देशमुख गोरठेकर, सुभाष पाटील कोंडलवार, मोहनराव पाटील हासापूरकर, दत्तात्रय पांचाळ, दिलीप तिवारी, एडवोकेट शिवाजी कदम, इंजिनियर विश्वंभर पवार, डॉक्टर इनामदार जवाजुद्दीन बरबडेकर, बालाजी पाटील, गणेश बोलेवार, अफरोज पठाण, प्रमोद देशमुख, संजय पाटील मुरगुलवार, यशोदाबाई शेळके, आत्माराम कपाटे, आनंद पाटील शिंदिकर, दासराव पाटील पुयड, आनंद चिठे पाटील बोरगावकर, उमेश कापसे पाटील, पंकज देशमुख भोसीकर, एडवोकेट मोरे खरबिकर, एडवोकेट अल्तमश, दतराम पाटील मंगल, भुजंगराव देशमुख, दिलीपराव देशमुख सोमठाणकर, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहू महाराज विद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख कामणगावकर यांनी केले, तर आभार जगदंबे सर यांनी मांनले, कार्यक्रमास हजारो गोरठेकर प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता भोकर येथील तरुण पत्रकार विलास हटकर यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
ईतर बातम्यांसाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.
0 Comments