रमेश गंगासागरे

भोकर तालुक्यात मागील  20 जुलैच्या रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे ओढे आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक गावात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अशातच मौजे जामदरी येथील नाल्याला दि. 22 जुलै च्या रात्री पूर आल्यामुळे शेता कडून घराकडे परत येणारे दोन तरुण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती भोकर येथील प्रशासकीय यंत्रणेला कळताच त्यांनी वेळ न दवडता लागलीच दोन तरुणांना वाचण्यासाठी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि त्या दोन तरुणांना सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढून जीवन दान दिल्याने प्रशासकीय यंत्रणेचे तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
     घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, तालुक्यातील मौजे जामदरी येथे दोन तरुण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्री, राजेंद्र खंदारे यांना मिळताच त्यांनी आपल्या सोबत तहसीलदार श्री, भरत सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक श्री, विकास पाटील यांच्यासह घटनास्थळाकडे रवाना झाले. तिथे जाताच त्यांनी दोन तरुणांना वाचण्यासाठी वेळ न घालवता स्वतः पाण्यात उतरले, वेळ रात्रीची असूनही ते डगमगले नाहीत, हिम्मत वाढवण्यासाठी सोबतीला पोलीस निरीक्षक विकास पाटील आणि तहसीलदार भरत सूर्यवंशी होतेच, अधिकाऱ्यांची हिम्मत पाहून काही नागरिकही बचावकार्यासाठी मदतीला धावून आले, आणि काही वेळातच दोरखंडाच्या साह्याने पुरात अडकलेल्या दोन तरुणांना वाचवण्यात यश आले आहे. आपल्या आगळ्या-वेगळ्या कार्यशैली मधून कार्य करणारे उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्रजी खंदारे हे सर्वदूर परिचित आहेतच आता त्यांनी अशा पद्धतीने तरुणांना वाचल्यामुळे त्यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले जात आहे.

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा