भोकर :(दि.20 जुलै )
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील असंख्य वाहनधारक व शहरातील वाहनधारक भोकर शहरात आपल्या विविध कामासाठी दुचाकीवर येऊन आपली दुचाकी रोडवर बेशिस्तपणे रोडवर उभी करून ईतर वाहनांना अडथळा व त्रास होईल अशा अवस्थेत सोडल्याने अशा वाहनधारकांच्या गाड्यांची हवा सोड कार्यवाही आज करण्यात आली.
आज दिनांक 20 जुलै रोजी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा वाजल्यापासून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, किनवट रोड, नांदेड रोड, तसेच तहसील कार्यालय पर्यंतच्या भागात भोकर पोलीस प्रशासनाच्या वतीने अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांच्या विरोधात धडक कार्यवाही मोहीम हाती घेण्यात आली होती, बेशिस्त वाहने रोडवर अस्ताव्यस्त उभी राहत असल्यामुळे वृद्ध,महिला, मुले व नागरिकांना रोडवरून चालणे कठीण जात होते,त्यामुळे आज हवा सोड कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये जवळपास 35 ते 40 पोलीस कर्मचारी वर्गांनी भाग घेतला होता, तसेच पोलिसांच्या वाहनातून नही वाहनधारकांना गाड्या बाजूला लावण्यासंदर्भात अनाउन्समेंट करण्यात येत होती तरीसुद्धा वाहनधारक नागरिकांनी आपल्या गाड्या बाजूला न केल्यामुळे अशा वाहनावर प्राथमिक स्वरूपाची कार्यवाही म्हणून दुचाकी व चारचाकी वाहनांची हवा सोडण्यात आली आज जवळपास 80 ते 90 मोटारसायकल व 10 ते 15 चार चाकी वाहनांची हवा सोडण्यात आली. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले ह्याच पद्धतीची हवा सोड मोहीम बसस्थानक परिसरामध्ये राबवावी अशी मागणी भोकर येथील नागरिक करत आहेत.
0 Comments