भोकर : (दि.18 जून )
रमेश गंगासागरे
भोकर तालुक्यातील नांदा पट्टी म्हैसा येथील गट क्रमांक 184 मध्ये निखिल कंट्रक्शन च्या जेसीबी चालकाने पेरलेल्या शेतामध्ये जेसीबी चालवून एक लाखाच्यावर रुपयाचे नुकसान केले असल्याने निखिल कंट्रक्शन आणि जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मौजे नांदा येथील अनेक शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक भोकर यांच्याकडे केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मैसा रोडवर निखिल कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे सदरील कामावर अनेक जेसीबीच्या साह्याने मुरूम उत्खनन करन्याचे काम चालू आहे. दिनांक 17 जून रोजी कामावर चालू असलेली मशीन रोड लगत असलेल्या शेतकऱ्याची परवानगी न घेताच शेतकऱ्यांच्या पेरलेल्या शेतामध्ये फिरत असल्याने आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही मशीन गट क्रमांक 184 मध्ये गंगाधर नारायण मानेबोईनवाड आणि प्रकाश नारायण मानेबोईनवाड यांच्या शेतामधील पेरलेल्या बियाण्याचे व पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे जेसीबी चालक व निखिल कंट्रक्शनच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाची लेखी तक्रार सदरील शेतकऱ्याने पोलीस निरीक्षक भोकर यांना दिली आहे. निखिल कंट्रक्शन चे कर्मचारी सुद्धा रोड लगत असलेल्या शेतकऱ्या सोबत मुजोरपणा ची वागणूक देत असल्याचे अनेक शेतकरी बोलत आहेत भोकर तालुक्यात अवैद्य मुरूम उत्खननाचे प्रकार वाढले असल्याने तहसीलदार भोकर यांनी अवैधरित्या गौण खनिज घेणाऱ्यावर मोठी कारवाई केली होती, यामध्ये निखिल कंट्रक्शन वर सुद्धा लाखो रुपयाची दंडात्मक कार्यवाही केल्याचे प्रकरण ताजेच आहे. तर काही महिन्यापूर्वी मैसा रोडवर निखिल कंट्रक्शन च्या जेसीबी चालकाने भर रस्त्यामध्ये जेसीबी आडवी लावली असल्याने एका मोटर सायकल स्वाराचा मृत्यू झाला होता नंतर हे प्रकरण भोकर पोलीस स्टेशन मध्ये मिटल्याचे बोलले जात आहे हे प्रकरण सुधा ताजेच आहे. एकंदर निखिल कंट्रक्शन च्या कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि मुजोरपणा वाढल्याचे तालुक्यात बोलल्या जात आहे. त्यावर वेळीच आवर घालण्याची मागणी अनेक शेतकऱ्या तर्फे केली जात आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या Home वर क्लिक करा
0 Comments