रमेश गंगासागरे

भोकर शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अर्धवट नालीत नागरिक कचरा टाकत आहेत तर काही नागरिक अशा अर्धवट राहिलेल्या नालीत लघुशंका करत असल्याने दुर्गंधी पसरल्याचे चित्र भोकर शहरातील विविध भागात व तहसील परिसरात दिसत आहे.
     शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम मागील सहा ते सात वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले  पण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्या अनेक ठिकाणी अपुऱ्या व अर्धवट सोडल्यामुळे त्या नाल्यांमधून आता दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नागरिकांना अनेक रोगराईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र भोकर शहरामध्ये दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी रोडवर पडलेले पावसाचे पाणी नालीमध्ये वाहून जाण्यासाठी योग्य उपाययोजना केली नसल्याने नागरिकांना गुडघाभर पाण्यामधूनच् येणे-जाणे करावे लागत आहे. परिणामी रस्त्यावरून जाणाऱ्या असंख्य वाहनामुळे रस्त्यावर साचलेले पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत तहसील परिसरामध्ये अर्धवट नालीचा फायदा घेत अनेक नागरिक लघुशंका करत आहेत तर काही नागरिक अर्धवट नालीचा फायदा कचराकुंडी सारखा करत आहेत. सध्या पावसामुळे आता हा कचरा सडत चालला असल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन अर्धवट नाली पूर्ण करावी तसेच सडून जात असलेला कचरा तात्काळ ह्या ठिकाणावरून उचलून नेण्यात येऊन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, तसेच रस्त्यावरील पावसाचे पाणी नालीत जाण्यासाठी तात्काळ उपाय योजना करावी  अशी मागणी नागरिक करत आहेत.

इतक बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा