पावसाचा थेंब + वाऱ्याची झुळूक = लाईट गुल


   (रमेश गंगासागरे )
भोकर शहरात वाऱ्याची झुळूक आली रे आली की, लाईट गेली म्हणून समजा, आणि पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली की, लाईट गेलीच म्हणून समजा त्यामुळे पावसाचा थेंब प्लस वाऱ्याची झुळूक बरोबर लाईट गुल हे समीकरण आता नित्याचीच बाब झाली आहे, ढगाळ वातावरणामुळे आणि प्रचंड उकाड्याने त्रस्त नागरिकांच्या अंगावर घामाचे पाट वाहत आहेत.
      एप्रिल, मे महिन्यातील विजेचा लपंडाव आणि त्रस्त झालेल्या नागरिकांना जून महिन्यात तरी दिलासा मिळेल असे वाटत असतानाच 1 जून रोजी मध्यरात्री अचानक वीज गेल्यामुळे नागरिकांना उखाड यामध्येच रात्र काढावी लागली आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर शहरातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात सुद्धा वीज वितरण कंपनीने प्रचंड प्रमाणात वीज पुरवठा बंद करणे नागरिकांना वेठीस धरले होते त्यामुळे घरातील लहान बालके वृद्ध नागरिक यांना कमालीचा त्रास सहन करावा लागला होता आता जून महिन्यात तरी हा त्रास होणार नाही अशी आशा बाळगली जात असतानाच अचानक वीज जात असल्यामुळे घरामध्ये मोठ्याप्रमाणावर उकाडा जाणवत आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीने नागरिकांची गरज लक्षात घेऊन वीजपुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.

इतर बातम्या वाचण्यासाठी खालील home वर क्लिक करा