भोकर :(दि.3 जून )
रमेश गंगासागरे

     भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनि  यशस्वी कारभार करत सात वर्ष पूर्ण केेली आहेत, तसेेेच नांदेेेडचे लोकप्रिय खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना खासदार होऊन 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल  
भोकर भाजपा व महिला मोर्चाच्या वतीने शहरात बालाजी मंदिर येथे 1 जून रोजी महारक्तदान शिबीर, व कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी प्रणिता ताई देवरे पाटील ह्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
        त्या म्हणाल्या की, भारतामध्ये अनेक सरकारे आली आणि गेली पण मोदी सरकार सारखा पारदर्शक आणि निष्कलंक कारभार आज पर्यंत कोणत्याही सरकारने केला नाही, असे त्या म्हणाल्या. यावेळी मंचावर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्रलेखा ताई गोरे, भोकर तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजयाताई घिसेवाड, किशोर भाऊ देशमुख, कैलास भाऊ गोरठेकर, श्रीकांत किन्हाळकर, निलेश भाऊ देशमुख, किशोर पाटील लगळुदकर, दिवाकर रेड्डी, गणेश कापसे, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात एकूण 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच कोरोना काळामध्ये जिवाची पर्वा न करता तसेच शासनाच्या कोणत्याही सुविधा नसताना अंगणवाडी ताई, पत्रकार आणि आशा वर्कर यांनी नागरिकांच्या घरोघर जाऊन महत्वाचे कार्य केल्याबद्दल त्यांचा भोकर महिला मोर्चाच्या वतीने व भोकर भाजपाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी वाघमारे यांनी केले तर आभार नंदूभाऊ ऱ्याकावार यांनी मानले. कार्यक्रमास तालुका भरातून आलेले आशा वर्कर, अंगणवाडीताई, नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संपूर्णपणे कोरोना नियमांचे पालन करण्यात आले होते, हे विशेष. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भोकर तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ विजयाताई घिसेवाड व युवा आघाडीचे श्रीकांत भाऊ किन्हाळकर यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतल्याचे दिसून आले.

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा