भोकर: (दि.14 जून) 
   रमेश गंगासागरे

       शिक्षण व नोकरीत मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या न्याय मागण्यासाठी शहरातील मुस्लिम समाजाचा वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून मागणी करण्यात आली शिक्षण व नोकरीत मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या न्याय मागणीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एका ठिकाणी येऊन आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पुढिल मागण्याचे निवेदन  देण्यात आले. १) मुस्लिम समाजास शैक्षणिक व नोकऱ्या मध्ये 10 टक्के आरक्षण मिळावे. २) राज्यातील मुस्लिम समुदायातील शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी प्रशिक्षण व संशोधन बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर सुरु करण्यात यावेत. ३) जिल्हा पातळीवर मुस्लिम विद्यार्थ्यांना हॉस्टेल ची सुविधा मिळणेसाठी हॉस्टेल उभारणी करण्यात यावी. ४) शालेय अभ्यासक्रमात सामाजिक विविधता निर्माण होईल असे पाठयक्रम तयार करावेत. ५) अल्पसंख्याक शिक्षण संस्था मध्ये शिक्षक भरती तसेच अनुदान देण्यात यावे.अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र मुस्लिमांना शैक्षणिक, नोकरी आणि गृहनिर्माण शासकीय तसेच खासगी क्षेत्रात लोकसंख्येचा प्रमाणात कायमस्वरूपी आरक्षण मिळावे व तसा तो मुस्लिमांचा घटनात्मक व मूलभूत अधिकार असून राज्य सरकारने लवकरात लवकर मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे अश्या मागणीच निवेदन तहसीलदार श्री भरत सूर्यवंशी यांच्यामार्फत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठविण्यात आले असून निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता माजिद लाला, पञकार अहेमदभाई करखेलीकर, अ.हकिम अ करीम, ऍड. सलीम ऍड. मुजाहेद पञकार,  लतीफ शेख, हाशम कुरेशी, ईलियास कुरेशी, यांची उपस्तिथी होती.