भोकर :(दि.9 मे )
रमेश गंगासागरे
तालुक्यातील रायखोड येथिल एका ऊच्चशिक्षित तरुणाने ओसाड माळराणावरील कोरडवाहू शेतीत आपल्या भावंडांच्या मदतीने प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर अहोरात्र काम करून दगड गोटे बाजूला टाकून तसेच तीन किलोमीटरवरून शेतात पाणी आणून फळबाग फुलवली असल्याने त्यांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
ईच्छा तिथे मार्ग, ही मराठी मध्ये एक म्हण आहे. ही म्हण रायखोड येथील तरुणाला आज तंतोतंत लागू पडत आहे. एग्रीकल्चर मध्ये उच्च शिक्षण घेतल्यावर नोकरीकडे न वळता, मला शेतीच करावयाची आहे ती पण आधुनिक पद्धतीने, अशी खूणगाठ उराशी बाळगून हा युवक रायखोड परिसरातील ओसाड माळरानावर जवळपास 7 वर्षांपूर्वी पाणी शोधत होता, आज तो एक यशस्वी व प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपास आला आहे, त्यांचे नाव आहे, सूर्यकांत बिल्लेवाड. सूर्यकांत बिल्लेवाड यांनी चिकू, केशरआंबा, सीताफळ, लिंबू, मत्स्य शेती, सीडलेस लिंबू, जांभूळ, या फळबागेला पाणी कमी पडूनये म्हणून शेतात विहीर घेतली पण पाणी लागले नाही, हिंम्मत न हारता पुन्हा बोअरवेल मारले, पण त्यासही फारसे पाणी लागले नाही. आता काय करावे, फळबागेला व मत्स्यव्यवसायाला तर पाणी आवश्यक आहे, ते आणणार कुठून या विचारात असतांना, त्यांनी माळराणापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रायखोड येथून पाणी आणण्याचे ठरवले. हिंम्मत हारतील ते बिल्लेवाड कसले, त्यांनी मेहनत केली, अखेर गावातून शेतीपर्यंत पाईप टाकून पाणी आणलेच. आणि वाळून जाणाऱ्या फळबागेला व तडफडून मारणाऱ्या मत्स्य बीजांना जीवदान दिले आहे. आज त्यांच्या मेहनतीने अखेर फळ दिलेच. फळबागेतील प्रत्येक झाडाला फळे लगडलेली दिसून येत आहेत. त्यांच्या या फळबागेला व शेतीला अनेक मान्यवरांनी आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. त्यामुळे बिल्लेवाड हे प्रयोगशील शेतकरी म्हणून सर्वदूर परिचित झाले असून, फळबाग व मत्स्य शेतीतून वर्षाकाठी लाखोंरूपयांचे उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या आंब्यास आताच दूरवरून मागणी येत असल्याचे त्यांनी आम्हास सांगितले आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीला व परिश्रमाला भोकर न्युज लाईव्ह तर्फे सलाम.व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. - संपादक : रमेश जी.गंगासागरे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments