भोकर:(दि.3 मे)
रमेश गंगासागरे
दिनांक 2 मे रोजी व रात्री विजेच्या कडकडाटासह तालुक्यात तुफान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, तालुक्यातील बटाळा, चिदगिरी व पोमनाळा या गावात विजेने तांडव माजवला असून वीज पडून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पशुधन मारल्या गेले असून घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असल्याचे कळते. यात मानव हानी मात्र झाली नाही.
2 मे रोजी दुपारी विजेच्या कडकडाटा सह मोठ्या प्रमाणावर वादळ वारे सुटले होते, यातच आकाशामध्ये विजेचा कडकडाट होऊन पडलेल्या विजे मध्ये पोमनाळा येथील बाबू सूर्यवंशी व मोरे नावाच्या शेतकऱ्याच्या 8 शेळ्या मरण पावल्या तर 12 शेळ्या जखमी झाल्या आहेत. दुसऱ्या घटनेत चिदगिरी येथिल शेतकरी नामे चव्हाण यांच्या 3 म्हशी मरण पावल्या तर रात्री बटाळा येथील शेतकरी किशन शिंदे यांचे 2 बैल मरण पावले काल रात्री मौ जामदरी तांडा येथील अंकुश भोटूसिंग जाधव यांची गाय वीज पडून मयत झाली. असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळाचा पंचनामा महसूल प्रशासनातर्फे केला जात आहे. या घटनेत किती लाखाचे नुकसान झाले आहे हे अद्याप कळू शकले नाही.
0 Comments