भोकर :(21 एप्रिल)
  रमेश गंगासागरे

येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज दिनांक 21 एप्रिल रोजी रामनवमी च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक तरुणांनी हिरीरीने सहभाग घेऊन उत्साहात रक्तदान केले आहे.
       श्रीराम जन्मोत्सव समिती दरवर्षी भोकर शहरामध्ये राम नवमी निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करत असते मागील वर्षीपासून लोक डाऊन असल्यामुळे मनावर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेणे अशक्य असल्यामुळे समाज उपयोगी कार्य समितीच्यावतीने करण्यात येत असते, त्याचाच एक भाग म्हणून आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील भव्य रक्तदान शिबिरास भोकर शहर व तालुक्‍यातील अनेक नव तरुणांनी प्रतिसाद देत सहभाग नोंदवला श्रीराम जन्मोत्सव समिती ने नांदेड येथील गोळवलकर गुरूजी ब्लड बँकेस आमंत्रित केले होते. 

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा