नांदेड:(दि.18 एप्रिल)
रमेश गंगासागरे
नांदेड जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री विपिन इटनकर यांनी सोमवार दिनांक 19 एप्रिल पासून किराणा दुकाना सह फळे, भाजीपाला मार्केट व खाद्यपदार्थ पार्सल देणारी दुकाने यांच्या वेळा कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
किराणा दुकानात, फळे, भाजीपाला व खाद्यपदार्थ पार्सल देणाऱ्या दुकानांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री विपिन इटनकर यांनी हे निर्णय घेतले आहेत. नांदेड जिल्ह्यात व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोणाचा उद्रेक होत असल्याने तसेच अँटीजेन तपासणीमध्ये अनेक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्हाधिकारी नांदेड यांनी सोमवार पासून चालू असलेल्या आस्थापनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत ह्या आस्थापना सकाळी 8 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान शासनाने दिलेल्या सर्व नियमाचे पालन करून चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.नियम तोडणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
0 Comments