भारतीय जनता पार्टि महिला मोर्चाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
महिलांचा सन्मान
भोकर :(दि.8 मार्च )
रमेश गंगासागरे
महिलांच्या विविध प्रश्नावर पेटून उठणाऱ्या भोकर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, तसेच भोकर शहरातील स्वच्छतेला महत्त्व देणारे महिला कर्मचारी यांचा आज सन्मान करण्यात आला .
आज सकाळी 8 मार्च रोजी ग्रामिण रूग्नालय भोकर येथिल कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावनाऱ्या महिला डॉक्टर व नर्स यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामिण रूग्नालयातले वैध्यकिय अधिकारी मुंडे साहेब, टिट्परसे साहेब, मनोज पांचाळ व महिला कर्मचारी उपस्थित होते . भाजपाचे जि.उपा. दिलीपराव सोनटक्के, युवा मोर्चाचे जि. उपा.अजय टाक. महिला ता. अध्यक्षा विजया घिसेवाड , ओबीसी महिला ता.अध्यक्षा लताताई राठोड, शहर अध्यक्षा पूनम देशपांडे, उपाध्यक्षा मिनाक्षी दिक्षित ,युवती शहर अध्यक्षा सुनिता राचूटकर, सरचिटणीस भाग्यश्री देशपांडे उपस्थित होत्या. नगरपालिकेतील सफाई महिला कर्मचारी कोरोना काळातहि सेवा देवून कार्य करणाऱ्या महालांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments