भोकर:(दि.5मार्च)
   रमेश गंगासागरे

     मंडळ भोसी अंतर्गत  "प्रशासन आपल्या गावी" हा उपक्रम आज दिनांक 05/मार्च/2021 रोजी मौ. गारगोटवाडी पां. ता. भोकर या गावात राबविण्यात आला आहे. सदरील कार्यक्रमास तालुक्यातील सर्वच विभागांचे तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते. 
       कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर यांच्या हस्ते मा. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करुन चालू करण्यात आले आहे. या उपक्रमात तालुका स्तरीय अधिकारी यांनी त्यांच्या विभागाच्या योजनांची माहिती दिली. उपस्थित सर्वांना मा. राजेंद्र खंदारे (उपविभागीय अधिकारी भोकर) व मा. भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर) यांनी मार्गदर्शन केले. 
       सदर उपक्रमात...
महसूल विभाग मार्फत फेरफार अदालत घेण्यात येऊन 19 फेरफार निकाली काढण्यात आलेत. तसेच 2 नवीन फेरफारची नोंद घेण्यात आली. संजय गांधी योजनेसाठी 1, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनासाठी 10 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. पी एम किसान योजना मधील नोंदी दुरुस्त करण्यासाठी 6 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी 4 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. शिधापत्रिका अद्ययावत करण्यासाठी 7 अर्ज प्राप्त झाले आहेत.
       गटविकास अधिकारी कार्यालय मार्फत...2 मृत्यू दाखले देण्यात आले आहेत. 3 रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. 1 नमुना 8 चा उतारा देण्यात आला. 3 अर्जदार यांना वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
       उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मार्फत जमीन मोजणीसाठी 7 स्वीकारण्यात आले आहेत. त्यापैकी 5 जणांना तारखा त्यांना देण्यात आल्या आहेत.
      तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना करिता 17 अर्ज स्वीकारुन निकाली काढण्यात आले आहेत.
वनविभाग मार्फत जंगली जनावरांसाठी 2 पाणवठे जागांची निवड करण्यात आली. सहायक निबंधक सहकारी संस्था/बँक शाखाधिकार यांच्याकडे पीक कर्जासाठी 5 तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
उपअभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे वीजबिलबाबत 5 तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 3 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र भोकर यांनी या उपक्रमात 40 हेक्टर जमिनीवर वृक्षारोपणचे नियोजन केले आहे. रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड नियोजन केले आहे. गट लागवड तसेच कॅनॉलच्या बाजूने वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले आहे. महिला व बाल विकास विभाग मार्फत आढळून आलेल्या 4 कुपोषित बालकांची (दर्जावृद्धी) तपासणी करण्यात आली. तसेच तालुका आरोग्य विभाग मार्फत वयोवृद्ध ग्रामस्थ, महिला, किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आली तसेच लसीकरण सुद्धा करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी अध्यक्ष स्थानी मा. राजेंद्र खंदारे साहेब होते. प्रमुख उपस्थिती मा. भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर), मा. कांबळे (सहा. गटविकास अधिकारी), मा. मनोज विसपुते (उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय भोकर), मा. विठ्ठल गीते (तालुका कृषी अधिकारी भोकर), मा. राठोड (वनपाल), मा. रामगुंडावार मॅडम (सामाजिक वनीकरण अधिकारी भोकर), मा. रेखा चामनर (नायब तहसीलदार पुरवठा) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर) यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. गंगाधर वानोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मला (मंडळ अधिकारी भोसी) श्री. गंगाधर वनोळे, श्री. दुर्गादास राठोड (सरपंच पती), ग्रामस्थ मौ. गारगोटवाडी पां. यांची तसेच श्री. विजय ठाकूर, श्री. रामराव वागतकर, श्री. साहेबराव टोमके, कु. ज्योती राठोड, श्री. दत्ता चेके ह्या मंडळ भोसी मधील 5 तलाठी व श्री. हणमंत राहटीकर, श्री. सीताराम खंडागळे, श्री. मारोती बुद्धेवाड व श्रीमती अनुसया गायकवाड या 4 कोतवाल यांची पण मदत झाली.

 इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा