शिरोळ (प्रतिनिधी) :
   
       गुरु रविदास हे सनातनी नव्हे तर परिवर्तनवादी विचारांचे महामानव होते म्हणून परिवर्तन स्वीकारणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
         कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरु रविदास जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. मुक्ता सुनिल बरगाले ह्या होत्या. आपल्या ओजस्वी भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदास यांच्या नावापासून त्यांचा अपमान करण्यात आला. जाणूनबुजून त्यांच्या नावाचे, चित्राचे आणि चरित्राचे विडंबन करण्यात आले. हा सनातनी डाव आहे हे आपण आता ओळखले पाहिजे. पोथी, पुराण, पंचांग, तिथी, कालनिर्णय हे सारे सनातनी थोतांड आहे आणि ते आता आपण नाकारले पाहिजे व कालानुरूप बदलले पाहिजे. रविदास जयंतीची तिथी नाकारुन १५ फेब्रुवारी ही इंग्रजी तारीख कायमस्वरुपी स्वीकारली पाहिजे. गुरु रविदास यांनी समतेचे तत्वज्ञान मांडले, त्याप्रमाणे शाहू महाराज यांनी आरक्षण दिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या आरक्षणाला संरक्षण दिले म्हणून आपल्या जीवनाचे कल्याण होऊ शकले. आपला उद्धार कुणा देवा - धर्मामुळे नाही तर या महामानवांमुळे झाला आहे असे सांगून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी गुरु रविदास आणि फुले, शाहू, आंबेडकर यांचा सामाजिक संघर्ष व्यापक स्वरूपात यावेळी सादर केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव खटावकर यांनीही यावेळी आपले विचार मांडले. आधी केले मग सांगितले याप्रमाणे गुरु रविदास जयंती १५ फेब्रुवारी रोजी सुभाषनगर मिरज येथे आपण सणासारखी साजरी केल्याचे खटावकर यांनी यावेळी जाहिर केले. आता यापुढे सर्वांनी १५ फेब्रुवारी ही इंग्रजी तारीख लक्षात ठेवण्याचे आवाहन केले. दिपक टोणपे आणि पिंटू टोणपे यांनी यावेळी आपले मनोगत मांडले. यावेळी उपसरपंच लक्ष्मण माने, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब निर्मळे, नागेश शेजाळे, इस्माईल ऐनापुरे, प्रकाश टोणपे, वैभव कांबळे, ग्राम पंचायत सदस्य ज्योती गजानन कांबळे, रविना सतिष कांबळे, राजश्री गोडबोले, महादेव कुंभार, अर्जुन कांबळे, दिलीप शिंगे, विनायक कांबळे, महादेव कोळी, सुधीर कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल जाधव, अक्षय टोणपे, ओमकार पांडव, गुरु टोणपे, योगेश टोणपे, अश्विन वाघमारे, उमेश टोणपे, कृष्णा वाघमारे, सुभाष टोणपे, सागर वझिरे, गणपती टोणपे, कृष्णा टोणपे, सुमित गवळी, सीताराम टोणपे, संजय टोणपे, बजरंग टोणपे, गजानन टोणपे, नाना टोणपे, शांताबाई वाघमारे, विश्रांती टोणपे, नंदिनी पाखरे, पुजा टोणपे, चंदा टोणपे, लतिका टोणपे आदींनी परिश्रम घेतले. जयंती निमित्त घेण्यात आलेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत शंभू सुनिल टोणपे हे प्रथम आले असून प्रतीक संभाजी पाखरे यांनी द्वितीय तर आदित्य प्रकाश टोणपे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यांचा जयंती कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

 इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा