सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा भोकर नगरपरिषदेचे  माजी नगरसेवक श्यामसुंदर मेटकर वय 52 वर्षे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.
      श्याम सुंदर मेटकर यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते आज सायंकाळी त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली उद्या दिनांक 15 मार्च रोजी भोकर येथे दुपारी 2 वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.