रमेश गंगासागरे
भोकर भाजपाच्या वतीने उद्या दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 10 ते 02 या वेळात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील आरोग्य शिबिरासाठी तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार असून आरोग्य शिबिराचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार असून अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आरोग्य शिबिरामध्ये महिलांच्या विविध तपासण्या करण्यात येणार आहेत हा कार्यक्रम नांदेड रोड वरील डॉक्टर राम नाईक यांच्या दवाखान्यात आयोजित करण्यात आला आहे तरी जास्तीत जास्त गरजू महिला भगिनींनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भोकर भाजपा व भोकर महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments