नांदेड : प्रतिनिधी
दि.22 फेब्रु.
भोकर येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे कार्यकर्ते संदिप गंगासागरे यांची 21 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे भोकर तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री, कपिल जुनेकर यांनी दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे की, पक्ष बळकट करण्यासाठी तसेच फुले-शाहू-आंबेडकर व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार जनसामान्यात पोचवण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील. आणि पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयदेव अण्णा गायकवाड साहेब व प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव कांबळे साहेब यांच्या आदेशाने आपली निवड करण्यात येत असल्याचे दिलेल्या निवड पत्रामध्ये नमूद करण्यात आले असून संदिप गंगासागरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र व शोषल मीडियावर जोरदार अभिनंदन केले जात आहे.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा
0 Comments