भोकर (दि.10 फेब्रु.) रमेश गंगासागरे

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेल्या  सुचने नुसार राज्यात  दि. १० जानेवारी २०२१ रोजी आयोजीत करण्यात आलेल्या  किसान संमेलनास भोकरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.
       तालुका कॉग्रेस कमिटी व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी येथील कॉग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात किसान संमेलन आयोजीत करण्यात आले. प्रारंभी  दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या न्याय ह्क्कासाठी लढत असतांना बलीदान देणाऱ्या शेतकऱ्यांना भावपुर्ण  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जि.प. सदस्य तथा किसान संमेलनाचे पक्ष निरीक्षक प्रकाश देशमुख, माजी सभापती नागनाथ घिसेवाड यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही याबदल सरकारच्या कारभारावर टिका केली. प्रास्ताविकात कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील यांनी शेतकऱ्याच्या हिताविरूध्द असलेल्या तीन कृषी कायद्याची माहीती देवून किसान संमेलनाची भूमीका विशद केली. माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, जिल्हाउपाध्यक्ष  भगवान दंडवे,
साहेबराव सोमेवाड, खाजु इनामदार, मिर्झा ताहेर बेग, श्यामसुंदर मेटकर, आप्पाराव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील प्रकाश माधवराव देशमुख, व्यंकटराव रामजी पवार, गोविंद हरिश्चंद्र राठोड,बाबाराव भीमराव देशमुख, बालाजी पाटील हसापूरकर या प्रगतिशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन माजी नगरसेवक मनोज गिमेकर यांनी करून आभार मानले. यावेळी गोविंद देशमुख, सना इनामदार, विठल पाटील धोंडगे,  मन्सूर पठाण,सिध्देश्वर पिटलेवाड, सय्यद खालेद, विकास क्षिरसागर, सुरेश कावळे, गौतम कसबे,फारुख शेख करखेलीकर ,सुभाष चटलावार, आनंद देशमुख, लक्ष्मण डोंगरे, आरेफ इनामदार, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.