रमेश गंगासागरे
     भोकर पंचायत समिती कार्यालयाच्या समोर व रस्त्याच्या बाजूस कोणालाही अडथळा न ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने दोन दिवसापासून चालवण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम अखेर आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या एका फोनमुळे तूर्तास  ब्रेक लागुण पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे अतिक्रमण धारक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ते श्री अशोक चव्हाण यांचे आभार मानून आनंदोत्सव साजरा करत आहेत.
       भोकर पंचायत समितीच्या समोर रस्त्याच्या बाजूस भोकर येथील 45 ते 50 गोरगरीब नागरिक आपला छोटा-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते, त्यांना दुकाना व्यतिरिक्त उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते, त्यामुळे सदरील ठिकाणावर लॉन्ड्रीवाले, ड्रायक्लीन, चर्मकार, भंगारवाले, मोबाईल दुरुस्ती, झेरॉक्स सेंटर यांच्यासह अनेक छोटे व्यावसायिक अशा प्रकारचा छोटासा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते, अशातच येथील छोट्या व्यावसायिकांना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावून 24 तासाच्या आत जागा रिकामी करण्याचे लेखी आदेश दिले त्यामुळे सर्व व्यापारी वर्गात अशांतता पसरली होती, काही व्यापाऱ्यांना भोकर येथील न्यायालयाने दिलासा देत अतिक्रमण न काढण्या बाबत मनाई हुकूम दिला होता तरीसुद्धा या मनाई हुकुमास न जुमानता प्रशासन आपल्यापरीने अतिक्रमण काढण्यासाठी 6 फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच कामाला लागले होते, 2 जेसीबी मशीन 3 ट्रॅक्टर मोठा पोलीस बंदोबस्त पंचायत समितीचे असंख्य कर्मचारी दुकानासमोर तैनात होते, हे पाहून उपस्थित व्यापारी नागरिकांच्या उरात धडकी भरली होती, आता आपल्या पोटापाण्याचे काय होणार, या विचारात अनेकजण होते, कोरोनाच्या बिकट परिस्थितीतुन नुकत्याच सावरलेल्या दुकांनदारापुढे हे मोठे संकट होते, प्रशाशन 10 वाजता धडक कारवाई करणार होते, उपस्थित व्यापारी वर्गाची कळकळ पाहून काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विनोद पा.चिंचाळकर, जेष्ठ कार्यकर्ते परमेश्वर पा.ढवळे, हमीद पठाण यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून संपर्क साधून व्यापारी वर्गाची सद्य परिस्थिती कथन करून त्यांच्यावर दया दाखवावी व अतिक्रमण न काढता व्यापारी वर्गास सहकार्य करून प्रशाषणाला सांगावे अशी विनंती केली. त्यावरून अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाला सूचना केल्या त्यामुळे व्यापारी वर्गांचे आज निघणारे अतिक्रमण तूर्तास थांबविण्यात आल्यामुळे व्यापारी वर्गाकडून अशोक चव्हाण यांचे आभार मानण्यात येत आहेत, त्यांनी आज शहरात आनंदोत्सव साजरा केला आहे.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.