भोकर :(रमेश गंगासागरे)
 येथील विराट विश्वकर्मा प्रभू मंदिराचा कलशारोहण सोहळा दि. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  भोकर येथील म्हैसा रोड लगत विराट विश्वकर्मा प्रभू मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे त्या मंदिराचे सभामंडप बांधकाम व सुशोभिकरण देखील करण्यात आले,  कलशा रोहन कार्यक्रम दि. १४ फेब्रुवारी रोजीश्री महंत 108 स्वामी य दुबन महाराज दत्त संस्थान कोलंबी  यांच्या हस्ते व प. पू. उत्तम महाराज भो क र, प.पू. बालयोगी गजेंद्र स्वामी चैतन्य महाराज यांच्या उपस्थितीत  संपन्न होणार आहे त्या निमित्त दि. 12 फेब्रुवारी रोजी  ह. भ. प .लक्ष्मणदास शास्त्री महाराज यांचे कीर्तन दि. 13 फेब्रुवारी रोजी रात्री ह. भ. प . ओमसती राजेंद्र कानोजवर विरसनी, यांचे कीर्तन व दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता प.पू.बालयोगी गजेंद्र चैतन्य स्वामी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, होम हवन विधि वेदशास्त्रसंपन्न अमोल सुतार शास्त्री पंढरपूर व अभिजीत पांचाळ शास्त्री उस्मानाबाद यांच्या हस्ते संपन्न होईल या कार्यक्रमाचा भाविकांनी व विश्वकर्मा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आव्हान भोकर येथील समस्त विश्वकर्मा बांधव मंडळाकडून करण्यात आले आहे.
      
      इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा