भोकर(दि,7 जानेवारी)
रमेश गंगासागरे
काळ वेगाने बदलत चालला असून बदलत चाललेल्या या युगात पत्रकार सुद्धा आधुनिक झाले आहेत, कोणत्याही कार्यालयातील व समाज हिताची अचूक बातमी तात्काळ येत असल्याने अधिकाऱ्या पुढील आव्हाने सुधा वाढत चालली असल्याचे मत भोकर येथील उपविभागीय अधिकारी श्री, राजेंद्र खंदारे यांनी पत्रकार दिनी व्यक्त केले.
नांदेड रोड वरील नारवाट येथे पर्यटन स्थळ असलेल्या गुड्डा महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते, कार्यक्रमाची सुरुवात महादेव मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करून झाली, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार श्री भरत सूर्यवंशी हे होते. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 सांली दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली त्या प्रित्यर्थ दरवर्षी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो.
कार्यक्रमात वृक्षारोपना नंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर. पांचाळ यांनी बाळशास्त्री जांभेकरांनी त्याकाळी मराठी वृत्त पत्र चालवून समाजाची जागृती केली, इंग्रजांविरुद्ध परखड लिखाण केले वाईट चाली-रीती विरुद्ध आवाज उठवला , महात्मा फुले, बाळ गंगाधर टिळक, आचार्य अत्रे ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनंतराव भालेराव यांनीही विचाराची धुरा चालवली त्यांचेच विचार आज अंगी बाळगून पत्र कारिता सांभाळणे गरजेचे आहे असे मत मांडले. पत्रकार एल.ए.हिरे यांनी आजच्या युवा पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून लोकाभिमुख, समाजाभिमुख पत्रकारिता करावी असे विचार मांडले. पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे म्हणाले की, सध्याच्या काळात निर्भिड व यशस्वी पत्रकारिता करण्यासाठी अनेक अडचणी समोर येत आहेत. अनेक अडचणींना सामोरे जात पत्रकारांना आव्हाने पेलावे लागत आहेत, अशा वेळी बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली पत्रकारिता डोळ्यासमोर ठेवून समाजहिताच्या दृष्टीने पत्रकारांनी आपली लेखणी चालवावी, भोकरच्या पत्रकारांनी विधायक कामाला मोठे सहकार्य केले असून येथील पत्रकारांनी चांगल्या कामाचा नेहमीच गौरव केलेला आहे असेही ते म्हणाले, यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी, पत्रकार मनोज गीमेकर, बी.एस. सरोदे, संपादक,रमेश गंगासागरे, विजय मोरे, विलास हटकर, शिवाजी गायकवाड, दिलीप पोत्रे, शंकर कदम आदींची उपस्थिती होती, सूत्रसंचलन बालाजी नारलेवाड यांनी केले तर आभार राजेश वाघमारे यांनी मानले.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments