भोकर: रमेश गंगासागरे
भोकर शहर व तालुक्याच्या गल्लीबोळात आज घडीस 200 च्या जवळपास मिनरल वाटर प्लांट कार्यरत आहेत त्यामध्ये अधिकृत कमी तर अनाधिकृत मोठ्या प्रमाणावर प्लांट कार्यरत आहेत, हे प्लांट धारक मिनरल वॉटरच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याने अशा प्लांटची तपासणी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे झाल्याचे बोलले जात आहे.
आज आपण पाहत आहोत की, घर असो की, प्रतिष्ठान सगळीकडे नागरिक मिनरल वॉटरची मागणी करत आहेत, ह्या वाढत्या मिनरल वाटरची मागणी लक्षात घेऊन शहरातील काही पाणी माफिया लोकांनी आपली दुकाने थाटली आहेत, भोकर मध्ये 20 लिटर पाण्याचे जार मिनरल वाटर भरून देण्याचे कार्य वरील प्लांट धारक नित्यनियमाने करत असतात, ह्या 20 लिटर पाण्यासाठी 20 रुपये या दराप्रमाणे नागरिकाकडून वसुली करुन महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत, पण पाण्याच्या दर्जाचे काय? पाण्याचा दर्जा कोणी तपासावा? अनेक प्लांट धारक विविध प्रकारचे केमिकल पाण्यामध्ये टाकून पाणी शुद्ध करताना दिसून येत आहेत, हे केमिकल आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे, हे तपासण्याचे कार्य संबंधित खात्याचे असतानाही या खात्याचे कर्मचारी भोकर मध्ये कधीच आलेले दिसून येत नाहीत, त्यामुळे पाणी माफिया आणि ह्या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याचे सगळीकडे बोलल्या जात आहे. अशा प्लांट चे पाणी पिल्यावर नागरिकांची हाडे ठिसूळ होने, कंबर दुखणे व दातावरील समस्या उद्भवत असल्याचे अनेक जण बोलत आहेत.
20 लिटर पाण्याच्या जार बरोबरच भोकर शहरात पाण्याचे पॉकेट सीलबंद करून विकण्याचे कारखानेही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, ह्या पाण्याचा दर्जा सुद्धा अत्यंत खालावला असल्याने नागरिकांना शिळे पाणी पाजवील्या जात आहे, पाकिटातील पाणी पिल्याने अनेकांना मळमळ आणि उलट्या होत असल्याचे अनेक जण बोलत आहेत. त्यामुळे मिनरल पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्लांट वर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी भोकर येथील अनेक नागरिक करत आहेत.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा.
0 Comments