भोकर(दि,9डिसेंबर)
रमेश गंगासागरे
भोकर येथील शिवसाई गॅस एजन्सीचे मालक व कर्मचारी हे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या भर वस्तीत व सार्वजनिक रस्त्यावर अवैद्यरित्या भरलेल्या गॅस सिलेंडरचा साठा करून नागरिकांच्या व वाटसरूंच्या जिवाला धोका निर्माण करत असल्याने त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जावी या आशयाचे निवेदन विविध संघटनेच्या वतीने वरिष्ठांना देण्यात आले आहे.
येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रशाशक नगरपरिषद, तहसीलदार, आणि पोलीस निरीक्षक भोकर यांना अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे ता. अध्यक्ष रमेश गंगासागरे, आदिवासी विकास संघ(असो) महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष विजय मोरे व राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदिप गंगासागरे यांनी दि, 5 डिसेंबर रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरील गॅस एजन्सीचे मालक आणि कर्मचारी वर्ग यांनी शहरातील गंदेवार कॉलनी भागात भरलेल्या घरगुती व व्यवसायिक स्वरूपाच्या गॅस सिलेंडरचा अवैद्यरित्या मोठा साठा नागरिकांच्या वस्तीत आणि सार्वजनिक रस्त्यावर दररोज जमा करून ठेवत आहेत, त्यामुळे इथून जाणाऱ्या नागरिकांना व इथे राहणाऱ्या असंख्य नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे, या गॅस एजन्सीच्या अनेक तक्रारी कार्यालयास प्राप्त असूनही या एजन्सीवर आजपर्यंत कोणतीच कार्यवाही केली नसल्याने, येथील कर्मचारी व मालका विरुद्ध भारतीय दंड संहिते प्रमाणे कार्यवाही केली जावी व नागरिकांच्या जीवाचे रक्षण व्हावे असे निवेदनात म्हटले आहे, या वरही कार्यवाही झाली नाही तर नाईलाजाने आपल्या कार्यालापुढे लोकशाही मार्गाने आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.
0 Comments