भोकर : रमेश गंगासागरे

समाजातील दिव्यांग नागरिकाची मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा करून मानवता व बंधुभाव जपला गेला पाहिजे असे उदगार भोकर येथिल जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी न्यायालयात आयोजित जागतिक अपंग दिनानिमित्त व वकील दिनानिमित्त अध्यक्षीय मनोगतामध्ये काढले.
       आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी भोकर येथील न्यायालयात दुपारी जागतिक अपंग दिन व वकील दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश श्री पांडे, न्यायाधीश तळेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, मंचावर भोकर येथील ज्येष्ठ विधि तज्ञ ॲडव्होकेट लामकानी कर, ॲडव्होकेट कुंटे यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाच्या सुरुवातीस मंचावरील उपस्थित न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी उपस्थित सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींचे पुष्पहार घालून स्वागत केले, जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख हे पुढे बोलताना म्हणाले की, ईश्वराने जरी यांना अपंग केले तरी बुद्धीने मात्र ते आजही तल्लक आहेत, अपंगांनी स्वतःला अपंग न समजता हिमतीने कामे करून आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत हे दाखवून द्यावे, अपंगांच्या काही अडचणी असल्यास मला त्या अडचणी सोडवण्यास आनंदच होईल असे श्री मुजीब शेख यांनी म्हटले आहे, अपंगांनी ही न डगमगता संकटाचा सामना करावा तसेच इतर शासकीय मदतीसाठी भोकर न्यायालयातील विधी तज्ञांची मदत घ्यावी, तसेच अपंगांच्या मदतीला तालुका विधी सेवा समिती ही सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ अपंग कार्यकर्ते श्री,ढगे यांनी केले, तसेच सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲडव्होकेट शिवाजी कदम यांनी केले तर आभार ॲडव्होकेट श्री शेखर कुंटे यांनी मानले, कार्यक्रमास मोठ्या संख्येने तालुक्यातील अपंग बंधू आणि भगिनी उपस्थित होते, यावेळी अंँडवोकेट श्री,लोखंडे एडवोकेट श्री,भुजंग सूर्यवंशी एडवोकेट शेख मुजाहिद तसेच महिला ऍड.याच्यासह अनेक विधी तज्ञ उपस्थित होते.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.