भोकररमेश गंगासागरे

येथील गंदेवार कॉलनी भागातील भारत गॅसच्या शिव साई गॅस एजन्सीवर अनेक ग्राहकांची दिवसाढवळ्या लूट होत असल्याने ग्राहका मध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे, आता ह्या लुटी पासून ग्राहकांनी सावध राहणे गरजेचे झाले असून गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटना कडून  व कार्यकर्त्याकडून केली जात आहे.
       नागरिक रहात असलेल्या भरवस्तीत भरलेल्या गॅस सिलेंडरचा अवैधपणे मोठा साठा करून, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या याच गॅस एजन्सीची अनेक सामाजिक संघटनांनी या पूर्वीच तहसीलदार आणि वरिष्ठांकडे तक्रार केली आहे, आता ह्याच गॅस एजन्सीवर ग्राहकांना लुटण्याचे प्रकार समोर येत आहेत. नवीन गॅस कनेक्शन घेणाऱ्या अनेक ग्राहकाकडून पैसे जास्त घेतल्या जात असून त्यांना मात्र कमी पैश्याची पावती देण्यात येत आहे. या बाबद तहसीलदार यांना भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते एम.डी. शमीमोद्दिन ईनामदार  यांनी  तहसीलदार व  वरिष्ठाकडे लेखी तक्रार करून गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे, यांच्यासह अनेक तक्रारी आजपर्यंत प्राप्त आहेत, काही नागरिकांनी तर ऑनलाइन तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत, सदरील गॅस एजन्सीच्या मालकाने गॅस शेगड्या विकण्याचा सुद्धा धंदा सुरू केला असून गॅस एजन्सी वर निकृष्ट दर्जाची गॅस शेगडी बाजार भावा पेक्षा 3 पट जास्त दर लावून ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे, गॅस शेगडी घेणे गरजेचे नसतानाही, प्रत्येक नवीन गॅस धारकाला ह्याच दुकानावरून गॅस शेगडी,पाईप व लायटर घेण्याची सक्ती करण्यात येत आहे, त्यामुळे ग्राहकांच्या स्वातंत्र्याला हरताळ पुसली जात आहे, ह्याच गॅस एजन्सी वरील कर्मचारी हे विचारपूस करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांशी  असभ्य वर्तन करत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे, गॅस टाकीची घरपोच डिलिव्हरी करणारे कर्मचारी गॅस टाकी घरी आणून देण्यासाठी 40 ते 50 रु. जास्त मागणी करत असल्याने महिला वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे, या सर्व प्रकाराची वरिष्ठांकडून चौकशी करून सदरील शिवशाही गॅस एजन्सीचा परवाना रद्द करून ग्राहकांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी भोकर येथील अनेक सामाजिक संघटना कडून केली जात आहे. मागणी मान्य न झाल्यास तहसिल कार्यालयाच्या पुढे लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा इशाराही दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे.

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा