भोकर : संदिप गंगासागरे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर दीपक शिंदे यांची पंजाब राज्यातील चंदीगड विद्यापीठ येथील पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली आहे.
डॉक्टर दीपक शिंदे हे सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील पत्रकारिता व जनसंवाद या विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत या व्यतिरिक्त ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ गुरू गोविंद सिंगजी इंद्रप्रस्थ विद्यापीठ दिल्ली विश्व भारती विद्यापीठ शांतिनिकेतन कलकत्ता कल्याणी विद्यापीठ नाडिया पश्चिम बंगाल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर तज्ञ सदस्य म्हणून नियुक्त आहेत डॉक्टर शिंदे यांनी यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद मुंबई विद्यापीठ मुंबई मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ हैदराबाद यांच्या पत्रकारीता विषयाच्या अभ्यास मंडळावर काम केले आहे तर अभ्यासक्रम निश्चित कारण समिती सोलापूर विद्यापीठ सोलापूर व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या युनिव्हर्सिटी डिपारमेंट अंड इंटर डिसिप्लिन स्टडीज या महत्त्वाच्या समितीवर काम केले आहे डॉक्टर शिंदे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद अधिसभा विद्या परिषद ग्रंथालय समिती या समित्यांवर काम केले आहे सध्या अभ्यास मंडळ वगळता परीक्षा मंडळाचे सदस्य नेट परीक्षा समन्वयक म्हणून ते काम करताहेत यासोबतच जिल्हा प्रशासनाच्या covid-19 मीडिया मॉनिटरिंग कमिटी व निवडणुकीच्या माध्यम प्रमाणीकरण समितीवर काम करताहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ व राष्ट्रीय मुक्त व्यावसायिक संस्थेचे पत्रकारिता विषयांचे अभ्यासक्रम त्यांनी तयार करुन दिले आहे त्यात डॉक्टर शिंदे यांनी लिहिलेले चॅप्टर आहेत चंदिगड विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झाल्याबद्दल डॉक्टर शिंदे यांचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले डॉक्टर कुलसचिव डॉक्टर सर्जेराव शिंदे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होमवर्क क्लिक करा
0 Comments