मुंबई:(रमेश गंगासागरे)
राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निवडणुका पार पडतील. असा अंदाज वर्तविला जात आहे.
कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच बड्या महानगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निवडणुका पार पडतील. त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळू शकते. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने भाजपला धूळ चारली होती. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीसाठी राज्यभरात अनुकूल वातावरण असल्याची चिन्हं दिसत आहेत. परिणामी महाविकासआघाडीने याचाच फायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बड्या महानगरपालिकांच्या निवडणुका उरकण्याचे ठरवले असावे, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

0 Comments