भोकर : रमेश गंगासागरे
आज दिनांक 12 डिसेंबर रोजी भोकर येथील जिल्हा न्यायालयामध्ये महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या महालोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी एकूण 136 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली तर 63 लाख रुपयांची विविध बँकेची तडजोडीने वसुली करण्यात आली तसेच तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेले तीन संसार न्यायमूर्ती श्री मुजीब शेख यांनी जुळविल्यामुळे विवाहित दाम्पत्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसून आले.
आज सकाळी न्यायालयामध्ये लोकन्यायालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती श्री यांनी केले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोकर येथील उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी न्यायाधीश श्री पांडे न्यायाधीश श्रीमती तळेकर मॅडम यांची ही उपस्थिती होती, उद्घाटनप्रसंगी भोकर येथील जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख म्हणाले की, भांडण्यापेक्षा कोणत्याही प्रकरणांमध्ये तडजोड महत्त्वाची असून तडजोडीने याठिकाणी अनेक प्रकरणे निकाली काढता येऊ शकतात, भांडणांमध्ये दोन्ही बाजूचे वेळ श्रम आणि पैसा वाया जात आहे त्यामुळे सर्वांनी तडजोडीला महत्त्व द्यावे असे ते यावेळी महालोक अदालतीमध्ये निरंजन लक्ष्मण गायकवाड राहणार वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ तसेच प्रियंका गायकवाड राहणार भोशी तालुका भोकर जिल्हा नांदेड या विवाहित दाम्पत्याचा संसार काही कारणाने तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता, अशा गंभीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश श्री पांडे व न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी दोघा पती-पत्नीमध्ये समेट घडवून आणून दोघांना पुन्हा सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी प्रेरित केले न्यायाधीश समजावून सांगितल्यामुळे दोघं ती-पत्नीचा वाद संपुष्टात आला असून त्यांनी पुढील आयुष्य हे एकत्र जीवन जगण्याची शपथ न्यायालयात घेतली तसेच दुसर्या दोन पती-पत्नीमध्ये सुद्धा न्यायाधीशाने समेट घडवून आणल्यामुळे हे तिन्ही जोडपे न्यायाधीशांचे आभार मानले आहेत.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments