भोकर : रमेश गंगासागरे
भोकर शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या बाजूला गंदेवार कॉलनी कडे जाणाऱ्या व बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गास भोकर येथील शिवसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मार्ग असे नामकरण करून तिथे त्यांच्या नावाचा फलक दुभाजका मध्ये लावला होता, पण मागील 2 वर्षापासून त्या जागेचा फलक तसाच जमिनीवर पडून होता, त्या फलकाची दैनीय अवस्था झाली होती, त्या फलकाकडे भोकर शहरातील कोणताही शिवसैनिक वळूनही पाहिला नसल्याने तो फलक मागील वर्षी कोणीतरी अज्ञात ईसमाने उचलून नेला असावा अशी शँखा बाळगण्यात येत आहे.
काल दि, 17 नोव्हेंबर रोजी त्यांचा स्मृतिदिन होता, ह्या दिवसांपूर्वी तरी नामफलक त्या ठिकाणी लागेल असा अंदाज वर्तविण्यात येत होता, पण तो फलक लावण्यात शिवसैनिकानी ढिलाई केली,आणि त्यांना नामफलकाचा विसरच पडला. त्यामुळे येथील शिवसैनिक आता फक्त नावापुरतेच उरल्याचा भास येथील नागरिकांना होत आहे. आता राज्यात शिवसेनेची सता असल्याने ते जे सांगतील तेच खरे होणार आहे, त्यामुळे शिवसैनिकांची मान अभिमानाने उंचावत आहे, राज्यात सत्ता असल्याने शिवसैनिक शाशनाच्या विविध प्रकारच्या सवलती कश्या घेता येतील व मोठे कसे होता येईल ते पहात आहेत, व यातच ते मशगुल आहेत, पण स्वतः मोठे होण्याच्या नादात मात्र ह्या नामफलकाचा व मार्गाचा येथील पदाधिकाऱ्यांना विसर पडून गेला आहे, ज्यांचे नाव घेताच शिवसैनिकांना स्फुरण चढत होते, त्यांच्या जाण्याने आज मात्र शिवसैनिकांना विसर पडला आहे, अशीच चर्चा भोकर शहरात ऐकायला मिळत आहे.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा
0 Comments