भोकर : रमेश गंगासागरे
शहरातील कुपोशित बालकांची आरोग्य तपासणी आज 3 नोव्हेंबर रोजी दुपारी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे बालरोगतज्ञामार्फत करन्यात येऊन त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले.
भोकर शहरामध्ये एकूण 18 अंगणवाड्या अंतर्गत कुपोषित बालकांची ऐकून संख्या 34 असून त्यापैकी आज उपस्थित 25 बालकांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्री राजेन्द्र कंधारे यांनी भेट देवून उपस्थित कुपोषित बालकांच्या मातांना व पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. वरील कार्यक्रमास वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक मुंडे, बालरोग तज्ञ डॉ. धरमुरे, डॉ. सागर रेड्डी, RBSK, वैद्यकीय अधिकारी डॉ.टाकळकर डॉ. येन्नावार, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी श्री, वाघमारे यांचे प्रतिनिधी अंगणवाडी सुपरवायझर सौ.मेघमाळे, तसेच सर्व अंगणवाडी सेविका, स्वाती सुवर्णकार (ANM Rbsk), मल्हार मोरे (औषधनिर्माण अधिकारी) उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरी युनिट-3 बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सुपरवायझर सौ मेघमाळे, सर्व अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या कार्यक्षेत्रात फिरून कुपोषित बालके व त्यांच्या माता-पित्यांना सूचित करून कार्यक्रमास हजर राहण्याबाबत सांगितले होते त्यावरून आज 24 बालके आणि त्यांचे माता-पिता हजर राहिल्याने हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा.
0 Comments