भोकर : रमेश गंगासागरे
आज दि, 19 नोव्हेंबर रोज गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान तहसिल कार्यालयाच्या तळमजल्यावर अनेक गावच्या नागरिकांच्या उपस्थितीत सरपंच पदाची आरक्षण सोडत खेळीमेळीच्या वातावरणात पारपडली आहे.
पीठासीन अधिकारी श्री, भरत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सदरील 66 गावची आरक्षण सोडत पारपडली, यात आराध्या मंठाळकर ह्या सहा वर्षाच्या चिमूल्या मुलीच्या हस्ते चिठ्या काढण्यात आल्या होत्या. प्रथम अनुसूचित जातीच्या महिला वर्गासाठी सोडत काढण्यात आली त्यात दिवशी बु., गारगोटवाडी, महागाव, बोरगाव, लागळुद, तर अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी नागापूर, नारवाट, थेरबन, रिठा ही गावे सोडती दरम्यान काढण्यात आली. तसेच अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव गावे सायाळ, कोळगाव खु., दिवशी खु., बटाळा/किन्हाळा, हसापुर, जांभळी, रावनगाव तर धावरी, जाकापूर, डौर ही गावे अनुसुचित जमातीच्या सर्वसाधारण वर्गासाठी राखीव सुटले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (नामाप्र ) तालुक्यातील एकूण 18 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या असून त्यापैकी चिदगिरी हे गाव महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. तर कोळगाव (बु), वाकद, गारगोटवाडी, पाकी, सावरगाव माळ, नंदा (बु), कांडली, पांडुरणा, आणि हाळदा ही गावे नामाप्र सर्वसाधारण साठी आरक्षित आहेत. उर्वरित 23 ग्रामपंच्यायती ह्या खुल्या गटासाठी असून त्यापैकी 4 गावे महिला साठी राखीव आहेत ती अशी बेंद्री, डोरली(पांडुरणा), सोमठाणा, समंदरवाडी, आरक्षित आहेत. नागरिकांनी अधिकच्या माहितीसाठी तहसील कार्यालय भोकरशी संपर्क साधावा.
यासह अधिक बातम्यांसाठी खालील home वर क्लिक करा.
0 Comments