भोकर : रमेश गंगासागरे

भोकर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा प्रमुख व काही सीएसपी सेंटर वाल्यांचे जवळचे संबंध निर्माण झाल्यामुळे दोघांच्या संगनमताने शेतकऱ्यांची आर्थिक लूट चालू असल्यामुळे यांचे फोन जप्त करून तपासणी केल्यास मोठा घोळ उघडकीस येण्याची शक्यता छावाने व्यक्त केली आहे.

    अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना भोकरचे तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील सूर्यवंशी बोरगावकर यांनी उपविभागीय अधिकारी भोकर यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी व कर्मचारी हे काही दलाला मार्फत आलेल्या पिक कर्ज वाटपाच्या फाइली मंजूर करत आहेत, व सी एस पी सेंटर चालक शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खाते काढण्यासाठी 300 रुपये व पीक कर्ज मिळवून देतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडून 3000 हजार रुपये वसुली करत आहेत, तसेच सी एस पि सेंटर वाल्या मार्फत ज्या फाईली आल्या अश्याच फाईली मॅनेजर नी मंजूर केल्या आहेत, त्यामुळे इतर शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत, या बँकेत दलाल आणि मॅनेजरची मिलीभगत असल्यामुळे  या सर्वांचे फोन जप्त करून तपासणी केल्यास  मोठा घोळ उघडकीस  येणार असल्याचे  त्यांनी म्हटले आहे, 

जे शेतकरी दलालांमार्फत न जाता सरळ मार्गाने गेले आहेत, अशांच्या फाईली 40 दिवसापासून बँकेतच पडून आहेत, त्या फाईलची विचारणा करण्यासाठी बँकेत गेले असता मॅनेजर उद्धट पणाची भाषा करीत आहेत, या बँकेमधील चार सेवक सुद्धा या कामामध्ये मॅनेजरला सहकार्य करीत असल्याने त्यांची सुधा चौकशी करावी, अन्यथा दि.19 ऑक्टोबर पासून  उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे, निवेदनावर माधव पाटील सूर्यवंशी बोरगावकर, सुनील पाटील पवार, देविदास हुबेवाड, आदिनाथ पाटील लुंगारे, परमेश्वर सावळे धनंजय पाटील  यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा