भोकर : रमेश गंगासागरे
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पीक विमा घेटाळ्याची चौकशी करावी या व ईतर मागण्या साठी छावा तसेच भोकरशहर व तालुक्यातील 159 दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यासंदर्भात आज दिनांक 19 ऑक्टोंबर 2020 रोजी भोकर तहसीलच्या पुढे दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. तर नवीन खाते व पीक कर्जासाठी मौजे हळदा येथिल शेकडो शेतकरी देना बँकेच्या पुढे उपोषणास बसले आहेत.
घरकुलाचे प्रलंबित बिल तात्काळ मंजूर करावे, संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवर दिव्यांगांना सदस्य पद मिळावे, संजय गांधी निराधार योजना शासन निर्णय 15 ऑक्टोंबर 2018 व 20 ऑगस्ट 2019 च्या शासन आदेशाप्रमाणे दिव्यांगांच्या प्रलंबित रिफंड मिळावा, शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना डी आर डी मध्ये समाविष्ट करावे, शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना शासन आदेशाप्रमाणे व न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा, सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका मध्ये अपंगांसाठी आलेला 3 टक्के व 5 टक्के निधी चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करावा, शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना विविध योजना मिळाव्यात, तसेच ग्रामीण भागात सर्व शासकीय कार्यालयाच्या हद्दीत दिव्यांगांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून द्यावे, आणि दोनशे स्क्वेअर फुट जागा मोफत देण्यात यावी, समाजकल्याण अंतर्गत दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करावे, या व ईतर मागण्यांसाठी गणेश रामदास वर्षेवार व जिवन सखाराम राठोड हे उपोषणाला बसले आहेत. तर छावा तर्फे माधव पाटील बटाळकर यांच्यासह ईतर शेतकरी उपोषण करत आहेत.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर click करा.
0 Comments