भोकर : रमेश गंगासागरे
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे काल गुरुवार संध्याकाळी 74 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाल्याची वार्ता कळतात आज भोकर येथील अनेक सामाजिक बहुजन समाजात कार्य करणाऱ्या संघटनेच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेच्या अध्यक्षस्थानी भोकर येथील
ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते एल हिरे हे होते अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी वरील उद्गार काढले ते म्हणाले की केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर सभा आयोजित केलेली असतानाही त्यांनी मुंबई मध्ये येऊन जातीयवादी राजकारण करणाऱ्या पक्षांना आपल्या भाषणातून टोले मारले असा निर्भीड कार्यकर्ता मी आज पर्यंत माझ्या जीवनात बघितला नाही असे शेवटी उद्गार त्यांनी यावेळी काढले या कार्यक्रमाचे आयोजन लोकजनशक्ती पार्टी चे तालुकाध्यक्ष शेख मझर यांनी केले होते या कार्यक्रमास अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार रमेश गंगासागरे आदिवासी विकास संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय भाऊ मोरे कोळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड पत्रकार सजा उद्दीन शेख सुधांशू कांबळे आर.के. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे निखिल हंकारे, कदम भावरे यांच्यासह कार्यक्रमास असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय भीम पाटील यांनी केले तर आभार शिवाजी गायकवाड यांनी मानले.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments